जखमी तरूणीला भेटायलाही खासदार साहेबांना वेळ नाही?

Last Updated: Tuesday, January 14, 2014, 19:49

घाटकोपर रेल्वे स्थानकात झालेल्या अपघातात मोनिका मोरे नावाच्या तरूणीला आपले हात गमवावे लागले. मोनिका मोरेवर कोसळलेल्या या आपत्तीमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असताना, ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांना मात्र या दुर्दैवी जखमी तरूणीला भेटायला वेळ नाही.