चोरटे समजून तिघांची केली हत्या

Last Updated: Wednesday, May 9, 2012, 13:20

नागपुरात चोर समजून तिघांची ठेचून हत्या करण्यात आली आहे. नागपुरातल्या कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या भरतवाडा परिसरात ही घटना घडली. या परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरी आणि छेडछाडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यातच तीन जण भरतवाडा परिसरात संशयास्पद स्थितीत फिरत होते.