दांडीबहाद्दर आमदारांत काँग्रेसची बाजी

Last Updated: Saturday, July 28, 2012, 12:46

मराठवाड्यातील आमदार विधीमंडळात सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्याऐवजी दांडी मारण्यातच पटाईत असल्याचं महाराष्ट्र विधानसभेच्या अहवालातच समोर आलंय. गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मराठवाड्यातील विधानसभेच्या ५१ आमदारांपैकी ५० टक्के आमदारांनी कामकाजाला दांडी मारली. या दांडीबहाद्दर आमदारांमध्ये पहिला नंबर पटकावलाय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी