Last Updated: Sunday, February 23, 2014, 18:05
पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील टाकळीहाजी इथं दोन वर्षांचा मुलगा बोअरवेलमध्ये पडला. शुभम मोरे असं या चिमुकल्याचं नाव आहे. एका शेतात शुभमचे वडील ऊसतोडणीसाठी आले होते. त्याचवेळी खेळता खेळता शुभम शेतातल्या दीडशे ते दोनशे फूट खोल उघड्या बोअरवेलमध्ये पडला.