ठाण्यात महिला नगसेवक बेपत्ता

Last Updated: Saturday, March 3, 2012, 18:04

ठाण्यात महापौरपदासाठी आवश्यक असलेला ६६ चा जादूई आकडा गाठण्यासाठी महायुती आणि आघाडीत जोरदार चुरस असताना भाजपच्या महिला नगरसेवक बेपत्ता असल्याने नेतेमंडळींची धावपळ उडाली आहे. बेपत्ता नगरसेविका राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे बोलले जात असल्याने युतीची राजकीय कोंडी झाली आहे.