विदर्भासह महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ...

Last Updated: Sunday, July 21, 2013, 13:32

राज्यात सर्वदूर पावसानं हजेरी लावलीय. विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात वरुणराजा धो धो बरसतोय. चंद्रपूरला पावसाचा सर्वाधिक फटका बसला असून यात चौघांचा बळी गेलाय तर ७५ हजार हेक्टरवरील पिकाचं या पावसामुळं नुकसान झालंय.