मुंबई बेस्ट बंद, कर्मचारी आंदोलनावर तोडगा निघणार

Last Updated: Wednesday, April 2, 2014, 15:43

बेस्ट कर्मचा-यांच्या कामबंद आंदोलनावर तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झालीय. तोडगा काढण्यासाठी बेस्ट प्रशासन आणि बेस्ट कर्मचारी संघटनांमध्ये बेस्ट भवनमध्ये बैठक सुरू झालीय. बेस्ट प्रशासनानं `मेस्मां`तर्गत कारवाईच्या घेतलेल्या निर्णयानंतर कर्मचारी संघटना नरमल्याचं चित्र आहे.

स्कूल बस रस्त्यावर तरीही मुंबईकरांचे हाल, टॅक्सीकडून लूट

Last Updated: Wednesday, April 2, 2014, 12:09

बेस्ट कर्मचा-यांचा संप आज दुस-या दिवशीही सुरुचं आहे. त्यामुळे बेस्ट ने प्रवास करणा-या तब्बल 40 ते 45 लाख प्रवाशांचे आजही हाल होतायत. बेस्टच्या मुंबईसह उपनगरात सुमारे साडे चार हजार गाड्या धावतात. मात्र बेस्ट बंद असल्यामुळे टॅक्सी चालकांकडून मुंबईकरांची चांगलीच लूट होतेय.