अमेठीत मतदान केंद्रात फळ्यावर `कमळ`, राहुल गांधी संतापलेत

Last Updated: Wednesday, May 7, 2014, 18:25

अमेठीत आज आठव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली. मात्र, एका मतदान केंद्रावर फळ्यावर `कमळ` असल्याने यावर आक्षेप घेण्यात आलाय. ही बातमी कळताच काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि अमेठी लोकसभा मतदार संघातील उमेदवार राहुल गांधी संतापले. आपण याबाबत तक्रार करणार असून याची चौकशी झाली पाहिजे, अशी त्यांनी मागणी केलेय.

एका व्यक्तीसाठी स्वतंत्र मतदान केंद्र

Last Updated: Tuesday, April 22, 2014, 10:51

गुजरातमधील गिर अभयारण्यात केवळ एका मतदारासाठी उभारण्यात येणार असलेले स्वतंत्र मतदान केंद्र आयोगाच्या उत्कृष्ट कार्यक्षमतेचा एक उत्तम नमुना आहे. आशियायी सिंहांचा रहिवास असलेल्या गिरच्या अभयारण्यातील बनेज पाड्यावर राहणारे महंत भारतदास दर्शनदास यांच्यासाठी हे स्वतंत्र मतदान केंद्र तयार करण्यात येणार आहे.

कोणतेही बटण दाबा, मत राष्ट्रवादीला

Last Updated: Tuesday, February 7, 2012, 17:12

कोल्हापूरमधील कागल तालुक्यातील हसूर खुर्द येथील मतदान केंद्रांवर यंत्रात बिघाड झाल्याने गोंधळ निर्माण झाला. मतदाराने कोणतेही बटण दाबले, तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह असलेल्या घड्याळ्यालाच मत पडत असल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर, गावकऱ्यांनी गोंधळ घातला.