राज ठाकरेंच्या सभेचा संभ्रम संपला, सभा एसपी मैदानावर

Last Updated: Saturday, February 8, 2014, 23:06

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ९ फेब्रुवारी रोजी होणार्‍या सभेसाठीच्या जागेचा शोध शनिवरी अखेर संपला. आता ही सभा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच एसपी कॉलेजच्या मैदानावर होणार आहे. तसं पत्र एसपी कॉलेज प्रशासनाने दिलं आहे. त्यामुळे सभेबाबतच संभ्रम संपलाय.

मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम, सभा कुठे?

Last Updated: Saturday, February 8, 2014, 10:31

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभेच्या ठिकाणाचा गोंधळ अजूनही सुरूच आहे. मुठा नदीच्या पात्रात राज ठाकरेंच्या सभेला जागा मिळाल्यानंतर आता एसपी कॉलेजचं मैदान उपलब्ध झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे नेमकी सभा कुठे होणार याबाबत संभ्रम अजूनच वाढलाय. विशेष म्हणजे पुण्यातले पदाधिकारी मात्र या सर्व गोंधळाबाबत अनभिज्ञ आहेत.