यंदाची निवडणूक सर्वात महागडी, ३३४२६ कोटी खर्च!

Last Updated: Wednesday, May 14, 2014, 11:25

लोकसभा निवडणूक म्हणजे कोट्यवधींची उधळण हे पुन्हा दिसून आलंय. यंदाची निवडणूक तर सर्वांत महागडी ठरली आहे. निवडणुकीसाठी सरकारनं ३४२६ कोटी रुपये खर्च केले, तर विविध राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडून ३० हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत. त्यामुळं एकत्रित ३३,४२६ कोटी रुपयांचा चुराडा या निवडणुकीत झाला आहे.