५२ हजार बेपत्ता, वर्षभर केदारनाथ यात्रा स्थगित

Last Updated: Thursday, June 20, 2013, 19:08

उत्तराखंडमध्ये अचानक आलेल्या महापुराच्या दृष्यांनी आपल्या काळजाचा थरकाप उडवलाय. उत्तराखंडच्या प्रलयानंतर आता तिथं हाहाकार उडालाय. अनेक जण दलदलीत अडकून पडलेत. काही जण मृतांजवळच आपला जीव मुठीत घेऊन गोठवणाऱ्या थंडीत आहेत. उपाशीपोटी हजारो पर्यटक अडकून पडलेत. आता उत्तराखंडमध्ये जलप्रलयानंतर आता मदतकार्य वेगानं सुरू झालंय. अद्याप ५२ हजार जण बेपत्ता असल्याचं सांगितलं जातंय. दरम्यान, वर्षभर केदारनाथ यात्रा स्थगित करण्यात आलेय.