आंदोलन फसलं... 'चर्चा' तर होणारच!

Last Updated: Wednesday, February 12, 2014, 18:54

टोलच्या मुद्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सुरू केलेलं रास्ता रोको आंदोलन अवघ्या ३६० मिनिटांत संपलं. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरूवारी सकाळी चर्चेसाठी बोलावल्यानं, राज ठाकरेंनी ३६० अंशात यू टर्न घेत, आंदोलन मागे घेतलं. चर्चाच करायची होती, तर आजचं आंदोलन करून राज ठाकरेंनी काय साधलं? असा सवाल उपस्थित केला जातोय.

राज ठाकरे - मुख्यमंत्री चर्चा मीडियासमोर?

Last Updated: Wednesday, February 12, 2014, 17:22

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना पोलिसांनी अडिच तास ताब्य़ात घेतल्यानंतर सोडून देण्यात आलंय. मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना फोन करून चर्चेचं आमंत्रण दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्याची घोषणा राज ठाकरेंनी केलीय.