Last Updated: Friday, June 6, 2014, 20:33
पश्चिम बंगालमधील आम आदमी पार्टीची राज्यातील संपूर्ण टीम संपली असल्याचा दावा भारतीय जनता पक्षाने केला आहे. आपच्या सर्व सदस्यांनी सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राज्यातील भाजपचे अध्यक्ष राहुल सिन्हा यांनी शुक्रवारी मीडियाशी बोलताना सांगितले की, आम आदमी पार्टी राज्यातून संपली आहे. यातील सर्व सदस्यांनी आमच्या पक्षात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.