आबांच्या तासगावमध्ये शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या

Last Updated: Saturday, March 15, 2014, 20:28

अवेळी पाऊस आणि गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या गारपीटीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासनाकडून मदत झालेली नाही. शेतीचे नुकसान आणि कर्जबारामुळे शेतकरी त्रस्त आहेत. सांगलीमधील तासगावमधील एका शेतकरी दाम्पत्याने गारपीटीने नुकसान झाल्यामुळे आत्महत्या केली.