Last Updated: Saturday, July 28, 2012, 14:20
अण्णा हजारेंनी आपल्या भाषणात ‘गर्दी नको दर्दी लोक पाहिजेत’ असं म्हणत लोकपाल बिलाविषयी सरकारच्या उदासिनतेवर टिका केलीय. सरकारकडून कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नसल्याचं अण्णांनी यावेळी सांगितलंय. आम्ही कोणतीही निवडणूक लढवणार नाही, ना कोणता पक्ष काढणार... लोकपाल बिलासाठी शेवटपर्यंत लढत राहणार असल्याचंही अण्णांनी म्हटलंय.