सीमाभागातल्या मराठी जनतेला न्याय मिळेल...

Last Updated: Wednesday, December 21, 2011, 11:53

पी.के.पाटील-महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष
राज ठाकरे यांनी केलेले वक्तव्य अत्यंत चुकीचे आहे. सीमा भागातील मराठी बांधवांनी गेली ५६ वर्षे झालेल्या अन्यायाच्या विरोधात तीव्र आंदोलन केलं आहे. या आंदोलनात दोन पिढ्या बरबाद झाल्या हे विसरून चालणार नाही. गेली पन्नास वर्षाहून अधिक काळ ही चळवळ थांबली नाही. सीमा भागातील मराठी बांधव शांततेच्या मार्गाने आपल्या न्याय मागणीसाठी हा लढा देत आहेत.

ज्ञान नव्हे अज्ञान पीठ

Last Updated: Tuesday, November 22, 2011, 12:14

बेळगाव इथे सीमाप्रश्न या संवेदनशील विषयाबाबत मतप्रदर्शन करताना त्यांनी मराठी माणसं फक्त भांडणं आणि दंगा करणारी असतात, असे अकलेचे तारे डॉ.चंद्रशेखर कंबार तोडलेत. हे कमी की काय म्हणून मराठी माध्यमातून शिकायचं असेल तर महाराष्ट्रात जा असंही पांडित्य त्यांच्या मुखावाटे बाहेर पडलं.