युतीच्या १४ आमदारांचे निलंबन मागे

Last Updated: Saturday, April 21, 2012, 13:58

रायगडमधील दिवेआगर दरोडाप्रकरणी विधानसभेत महाआरती करणा-या १४ आमदारांचं निलंबन अखेर मागे घेण्यात आलय. ३० मार्चला शिवसेनेच्या १३आणि भाजपच्या एका आमदाराचं याप्रकरणी एका वर्षासाठी निलंबन करण्यात आले होते.

सेनेने मूर्ती आणायला नको होती- मनसे

Last Updated: Friday, March 30, 2012, 20:37

शिवसेना-भाजप आमदारांनी विधानसभेत गणपतीच मूर्ती आणायला नको होती. असं वक्तव्य मनसे आमदार बाळा नांदगावकर यांनी केलीय. राज्य सरकारनं सत्तेचा दुरुपयोग केला असून निलंबन मागे घेण्यासाठी प्रयत्न केले तर आम्ही त्यांना मदत करु असेही ते म्हणाले.

युतीचे १४ आमदार वर्षभरासाठी निलंबित

Last Updated: Friday, March 30, 2012, 14:32

रागयड जिल्ह्यातील दिवेआगर गणेश चोरीचा तपास लागण्यासाठी आंदोलन करणाऱ्या युतीच्या १४ आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये शिवसेनेचे १३ तर भाजपचा १ आमदार एका वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे.