Last Updated: Saturday, September 7, 2013, 19:03
सामाजिक संस्थेच्या एकत्रित पाठपुराव्यामुळे आणि पोलीसांच्या तपासामुळे एक अमानुष प्रकार उघडकीस आलायं. पर्यटनाच्या नावाखाली बंगळूरला नेलेल्या चौदा वर्षीय मुलीला दोन वर्ष तेथेच डांबून ठेवले असून त्या मुली कडून घरकामे करून घेण्यात आली. पोलिसांच्या कार्यामुळे आता ती मुलगी आपल्या कुटुंबीयांकडे सुखरूप आहे.