मुंबईतील खड्ड्यांवर खड्डाजंगी, वादात मनसेची उडी

Last Updated: Thursday, July 25, 2013, 10:24

मुंबईतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवरून स्थायी समितीत जोरदार खड्डाजंगी झाली. स्थायी समितीने वेळोवेळी सूचना देऊनही पालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त आणि आताचे ठाण्याचे आयुक्त असीम गुप्ता यांनी खड्डे बुजविण्यात दिरंगाई केली. असा थेट आरोप करण्यात आलाय. तर खड्डे बुजवून बिल वसूल करण्याचा निर्णय पालिकेने घेतलाय. तर मनसेनेने सत्ताधाऱ्यांनाच जबाबदार धरलेय.