क्रिकेटच्या देवाच्या नावावर काळाबाजार, तिघांना अटक

Last Updated: Wednesday, November 13, 2013, 23:42

वानखेडेवर होणाऱ्या सचिनच्या शेवटच्या मॅचसाठी तिकिटांचा काळाबाजार जोरात सुरू आहे. याचसंदर्भात धक्कादायक बाब उघड झालीय. गरवारे क्लबच्या झनक गांधी, बॉम्बे जिमखान्याचे गिरीश प्रेमना आणि इस्लाम जिमखान्याच्या अजय जाधव यांना तिकिटाचा काळाबाजार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलीय.

खाद्यतेलाचा काळाबाजार, नऊ टँकर जप्त

Last Updated: Tuesday, October 15, 2013, 18:20

कोल्हापूर जिल्हा पुरवठा विभागानं खाद्यतेलाचा कृत्रिम साठा करणा-या नऊ तेल टॅँकरवर कारवाई केली आहे. १ कोटी २० लाख रुपये किंमतीचे हे खाद्यतेल असून दिवाळीसाठी या खाद्य तेलाचा कृत्रिम साठा केला असण्याची शक्यता पुरवठा विभागानं व्यक्त केलीय.

पावणे दोन लाखांचा तांदूळ जप्त

Last Updated: Sunday, July 22, 2012, 23:49

पिंपरी चिंचवड मध्ये शालेय पोषण आहारासाठी आलेल्या तांदळाची पोती काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असताना पोलिसांनी धाड टाकत दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी तांदळाचा ट्रकही ताब्यात घेतलाय.