Last Updated: Friday, November 18, 2011, 11:55
वाहन कर्ज घेणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देना बँकेने नव्या वाहन कर्जांवर 0.25 पॉईंटची सवलत जाहीर केली आहे. तसंच प्रोसेसिंग फी निम्म्याने कमी केली आहे. देना बँकेची ही फेस्टिव्हल ऑफर १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०११ पर्यंत लागु राहणार आहे. देना बँकेने नव्या गृह कर्ज आणि कारसाठी कर्जावरच्या व्याज दरात २५ बेसिस पॉईंटनी कपात केली आहे. तसंच ग्राहकांना नव्या कर्जावरच्या प्रोसेसिंग फी मध्ये सध्या आकारत असलेला एक टक्का दर निम्म्याने कमी केला आहे.