मुंबई पालिकेतील सत्ताधाऱ्यांचे काम, विरोधकांना धुपाटणे

Last Updated: Thursday, March 6, 2014, 09:19

मुंबई महापालिकेतील सत्तेचा वापर शिवसेनेचे पदाधिकारी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी व्यवस्थितपणे करून घेत आहेत. या पदाधिका-यांनी आपल्या मतदार संघातील वॉर्डसाठी कोट्यवधी रुपये बजेटमधून वळवले आहेत. तर दुसरीकडे विरोधी नगरसेवकांच्या वॉर्डसाठी तुटपुंजी तरतूद केलीय. याविरोधात विरोधकांनी पालिका आयुक्त आणि निवडणूक आयोगकडं दाद मागितलीय.