राज्यसभा : `एफडीआय`चा निकाल परिक्षेअगोदरच जाहीर

Last Updated: Friday, December 7, 2012, 13:13

लोकसभेपाठापोठ राज्यसभेतही एफडीआयचा मार्ग मोकळा होणार आहे. बसपा अध्यक्ष मायावतींनी राज्यसभेत एफडीआयच्या बाजूने मतदान करण्याची घोषणा केलीय. तर लोकसभेप्रमाणेच राज्यसभेतही सभात्याग करणार असल्याचं सपानं स्पष्ट केलंय. यामुळे एफडीआयच्या अग्निपरीक्षेत सरकार पास होणार हे नक्की झालंय.

लोकसभेत विरोधानंतर FDI रिटेलला मंजुरी

Last Updated: Wednesday, December 5, 2012, 19:18

लोकसभेत विरोधानंतर FDI रिटेलला मंजुरी मिळाली. त्यामुळे केंद्रातील युपीए सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. भाजपसह प्रमुख विरोधी पक्षांनी सुरूवातीपासून विरोध केला होता. यामध्ये भाजपने कडाडून विरोध करत विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी जोरदार ताशेरे ओढले होते.

एफडीआयमुळे बेरोजगार वाढेल - भाजप

Last Updated: Tuesday, December 4, 2012, 20:32

एफडीआयच्या मुद्दावर संसदेच्या सभागृहात जोरदार विरोध करत भाजपने आक्षेप घेतला. मल्टिब्रँड रिटेलमध्ये थेट विदेशी गुंतवणुकीमुळे शेतकऱ्यांची कोंडी होईल. त्यामुळे एफडीआय कोणाच्याही फायद्याचं नाही. रिटेल क्षेत्रात एकाधिकारशाही वाढेल, त्यामुळे एफडीआयचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी लोकसभेच्या विरोधी पक्ष नेत्या सुषमा स्वराज यांनी केली