या शुक्रवारी अनेक सिनेमांची मेजवानी

Last Updated: Thursday, January 31, 2013, 19:56

उद्या अतुल-सागरीकाची ‘प्रेमाची गोष्ट’ भेटीला येत आहे. सतीश राजवाडे दिग्दर्शित या मराठी सिनेमात अतुल कुलकर्णी आणि सागरीका घाटगे प्रमुख भूमिकेत झळकत आहेत. यानिमित्ताने हिंदीत चमकलेली सागरीका घाटगे पहिल्यांदाच मराठी सिनेमात दिसत आहे. तर अतुल कुलकर्णीची ही पहिलीच रोमॅण्टिक फिल्म आहे त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.