अरे बापरे, उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

Last Updated: Saturday, June 22, 2013, 19:16

उत्तराखंडमध्ये उद्या आणि परवा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्यानं बचावकार्य अधिक वेगानं सुरू करण्यात आलंय. केदारनाथ आणि गौरीकुंडच्या दरम्यान अडकून पडलेल्या १००० यात्रेकरूंना बाहेर काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात येतेय.

५२ हजार बेपत्ता, वर्षभर केदारनाथ यात्रा स्थगित

Last Updated: Thursday, June 20, 2013, 19:08

उत्तराखंडमध्ये अचानक आलेल्या महापुराच्या दृष्यांनी आपल्या काळजाचा थरकाप उडवलाय. उत्तराखंडच्या प्रलयानंतर आता तिथं हाहाकार उडालाय. अनेक जण दलदलीत अडकून पडलेत. काही जण मृतांजवळच आपला जीव मुठीत घेऊन गोठवणाऱ्या थंडीत आहेत. उपाशीपोटी हजारो पर्यटक अडकून पडलेत. आता उत्तराखंडमध्ये जलप्रलयानंतर आता मदतकार्य वेगानं सुरू झालंय. अद्याप ५२ हजार जण बेपत्ता असल्याचं सांगितलं जातंय. दरम्यान, वर्षभर केदारनाथ यात्रा स्थगित करण्यात आलेय.

पुरानंतर..उपाशीपोटी `ते`गोठवणाऱ्या थंडीत

Last Updated: Thursday, June 20, 2013, 18:32

उत्तराखंडच्या प्रलयानंतर आता तिथं हाहाकार उडालाय. देशभरातील हजारो पर्यटक सध्या उत्तराखंडमध्ये जागोजागी अडकून पडलेले आहेत. गोठणाऱ्या थंडीत, अनेक ठिकाणी जेवणा-पाण्याविना त्यांना रहावं लागतय.

गंगेचा प्रकोप, हजारोंचा जीव मुठीत

Last Updated: Wednesday, June 19, 2013, 19:21

उत्तराखंडात पावसा तडाखा आणि गंगेचा प्रकोप अनेकांच्या जीवावर बेतलाय. अजून हजारो जण आपला जीव मुठीत घेऊन मिळेल त्या ठिकाणी आसरा घेतला.

मान्सूनची पुन्हा प्रतिक्षा

Last Updated: Monday, July 16, 2012, 13:25

पावसाची प्रतिक्षा करणा-या राज्यातील जनतेला पुढील पाच दिवस तरी दिलासा मिळण्याची शक्यता नाही. पुढील पाच दिवस पावसाची अशीच स्थिती राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

मान्सूनची परिस्थिती चिंताजनक नाही - पवार

Last Updated: Tuesday, July 3, 2012, 12:43

मान्सूनच्या उशीरा आगमनामुळं देशातली परिस्थिती फारशी चिंताजनक नसल्याचा निर्वाळा केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी दिलाय. येत्या आठवड्यात मान्सून सक्रीय होईल आणि शेतीची चिंता मिटेल असा आश्वासक आशावाद शरद पवार य़ांनी व्यक्त केला.