LIVE Scorecard -भारत वि. न्यूझीलंड पहिली वनडे

Last Updated: Sunday, January 19, 2014, 08:20

भारत-न्यूझीलंड पहिल्या वनडे मॅचला सुरुवात झालीय. २०१४ चा वन-डे क्रिकेट सीझन टीम इंडियासाठी ड्रीम सीझन ठरला. मात्र, सीझनचा शेवट भारतीय टीमला विजयानं करता आला नाही. आता २०१४ चा क्रिकेट सीझन धोनी अँड कंपनीसाठी नवी आव्हानं घेऊन आला आहे. आणि यामध्ये टीम इंडियाला दोन हात करावे लागणार आहेत ते न्यूझीलंडच्या टीमसाठी. २०१५ वर्ल्ड कप पूर्वी धोनीच्या यंगिस्तानसाठी हा दौरा अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या तेज तर्रार विकेटवर टीम इंडियानं सपशेल लोटांगण घातलं होतं. त्यामुळं किवी दौऱ्यात कामगिरी उंचावण्याचं भारतीय टीमसमोर असणार आहे.

जेसी रायडर कोमातून बाहेर...

Last Updated: Saturday, March 30, 2013, 13:43

न्यूझीलंडचा बॅट्समन जेसी रायडर अखेर कोमामधून बाहेर आलाय. मात्र, कोमातून बाहेर आल्यानंतर त्याला बारमध्ये झालेल्या मारहाणीबद्दल काहीच आठवत नसल्याचं राडरनं म्हटलंय.

जेसी रायडर मारहाणः दोघे पोलिसांच्या ताब्यात

Last Updated: Friday, March 29, 2013, 13:51

न्यूझीलंडचा क्रिकेटपटू जेसी रायडर यांच्या मारहाण प्रकरणी दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. सुरूवातीला या प्रकरणात २० वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात होती. त्यानंतर एका ३७ वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात येत आहे.

क्रिकेटर जेसी रायडरला मारहाण, रायडर कोमात

Last Updated: Thursday, March 28, 2013, 09:46

न्यूझीलंडचा क्रिकेटपटू जेसी रायडर याला बुधवारी रात्री ख्राईस्टचर्चमधील एका बार बाहेर जबर मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीमुळे तो कोमामध्ये गेला असून, त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.