अभंग - न्यूजरूम माझी पंढरी, बातमी विठ्ठल !

Last Updated: Tuesday, October 9, 2012, 22:46

प्रिय वाचकांनो, मागील आठवड्यात `तुकाराम` चित्रपट पाहिला. स्टार प्रवाहवर, ( हे चॅनेल चांगला चित्रपट असेल तरच पाहिलं जातं. ) या चित्रपटात संतू तेली हे पात्र होतं. लहानपणी सगळ्याच संतोष नावाच्या मुलाला संत्या म्हणतात. काहींना संतूही म्हणतात. त्याला मी अपवाद नाही.