Last Updated: Sunday, January 19, 2014, 19:56
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा अखेरचा दिवस मोदींनी गाजवला. काँग्रेसला पराभव स्पष्ट दिसू लागल्यामुळेच राहुल गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या नावाची घोषणा झाली नाही अशी तोफ मोदींनी डागली. राहुल गांधींनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या भाषणाची चिरफाड मोदींनी केलीय. भारताला आता स्वराज्यासह सुराज्याची आवश्यकता आहे असं ते म्हणाले.