मुंडेंसारखा संधीसाधू नेता शोधून सापडणार नाही – राष्ट्रवादी

Last Updated: Wednesday, December 11, 2013, 17:22

भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना संधीसाधू म्हटले होते. राष्ट्रवादीने मुंडे यांना जशास तसे उत्तर दिले आहे. मुंडे यांच्यासारखे संधीसाधू व्यक्तिमत्वदेशातही शोधून सापडणार नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.