`फायलिन`ची तीव्रता कमी केली मुंबईतील प्राध्यापकाने!

Last Updated: Monday, October 14, 2013, 13:55

`फायलिन` हे चक्रीवादळ ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर धडकणार आहे. त्यामुळे खूप मोठी वित्त आणि जीवीत हानी होऊ शकते. याबाबतची कल्पना पाच दिवसांपूर्वीच कपिल गुप्ता या मुंबई आयआयटीच्या प्राध्यापकाने दिली होती. त्यामुळे लाखो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात सरकारला यश आले आणि मोठी हानी टाळण्यात सरकार यशस्वी झाले आहे.

फायलिनला भारताने हरवलं

Last Updated: Sunday, October 13, 2013, 13:16

फायलिनला भारताने हरवलं आहे. शनिवारी ओडिशा आणि आंध्रच्या किनारपट्टीवर धडकलेल्या फायलिन चक्रीवादळाचा वेग मंदावलाय. गोपालपूरमध्ये वारे आता ताशी 90 ते 100 किमी वेगाने वारे वाहत आहेत.

फायलीनचं संकट उंबरठ्यावर, तीन जणांचा मृत्यू

Last Updated: Saturday, October 12, 2013, 18:05

फायलीन चक्रीवादळ वेगाने भारताच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलंय. ‘फायलीन’ ओडिशामध्ये धडकण्यापूर्वीच वादळामुळे झाडं उन्मळून पडल्यानं तीन जणांचा मृत्यू झालाय.

फायलीन चक्रीवादळ : विमानसेवेवर परिणाम, मच्छिमारांना इशारा

Last Updated: Saturday, October 12, 2013, 15:08

फायलीन चक्रीवादळाच्या शक्यतेमुळे विमानसेवेवरही परिणाम झाला आहे. काही उड्डाणं रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. तर मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आलाय.

फायलीन चक्रीवादळाचा वेग वाढलाय

Last Updated: Saturday, October 12, 2013, 09:50

फायलीन चक्रीवादळाचं काउंटडाऊन सुरु झाले आहे. फायलिनचा वेग आणखी वाढला आहे. हे वादळ ओडिशाच्या भोपालपूरपासून ३४५ किमी दूर आहे. आज संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास हे वादळ ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलीय.