महायुतीच्या नेत्यांचं सरकारवर आसूड

Last Updated: Thursday, January 30, 2014, 22:24

महायुतीच्या इचलकरंजीत झालेल्या पहिल्या महासभेत सर्व नेत्यांनी आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. टोल, वीज, सहकारातला भ्रष्टाचार, सिंचन घोटाळा आदी मुद्यांवरून सरकारवर शेतकऱ्यांचा आसूड ओढला. मात्र सर्वांचा टीकेचा रोख होता तो राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर.

‘आप’नं फेटाळला ‘स्वाभिमानी’चा प्रस्ताव!

Last Updated: Wednesday, January 1, 2014, 19:22

शेतकऱ्यांसंदर्भातल्या आमच्या अटी मान्य केल्या तर ‘आप’सोबत आघाडी करणार असल्याचं वक्तव्य राजू शेट्टी यांनी केलं होतं. मात्र अटींवर आधारीत राजकारण ‘आप’च्या तत्वात बसत नसल्याचं सांगून राजू शेट्टींचा सशर्थ आघाडीचा प्रस्ताव आम आदमी पार्टीनं फेटाळून लावलाय.

उसाला २६५० रुपये पहिली उचल घ्यायला मान्यता

Last Updated: Friday, November 29, 2013, 19:49

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजु शेट्टी यांनी एक पाऊल पाठिमागं घेत २६५० रुपये उसाला पहिली उचल घ्यायला मान्यता दिली असली तरी कोल्हापुरात सकाळपासून ठिकठिकाणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी हिंसक आंदोलन केलं.