नरेंद्र मोदींना अटक करा, तृणमूल काँग्रेसची मागणी

Last Updated: Monday, May 5, 2014, 22:20

आचार संहितेचा भंग केल्याप्रकरणी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींच्या अटकेची मागणी तृणमूल काँग्रेस पक्षानं केली आहे. जातीच्या नावावर मतं मागितल्याचा आरोप करत तृणमूल काँग्रेस पक्षानं मोदींविरोधात अटकेची मागणी करणारं पत्र निवडणूक आयोगाला पाठविलंय.