रणजी सामना : सचिनने जिंकून दिलं आणि सहकाऱ्यांनी उचलून घेतलं

Last Updated: Wednesday, October 30, 2013, 13:38

मुंबई विरूद्ध हरयाणा रणजीचा सामन्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने शानदार अर्धशतक झळकावले. या अर्धशतकाच्या जोरावर मुबंईने आपला विजय साकार केला. तर सचिनचा हा शेवटचा रणजी सामना असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सचिनने आपल्या चाहत्यांना निराश केले नाही तर आपल्या कामगिरीचा शेवटही चांगला केला. धवल कुलकर्णी यांने विजयी फटका मारल्यानंतर सहकाऱ्यांनी सचिनला खांद्यावर उटलून घेऊन मैदानाला फेरी मारून सचिनचे कौतुक केले.

अखेरच्या रणजीसाठी सचिन सज्ज, सर्वांच्या नजरा सचिनवर!

Last Updated: Sunday, October 27, 2013, 11:03

लाहलीत मुंबई विरुद्ध हरयाणा रणजी मॅचमध्ये मुंबईनं टॉस जिंकलाय. टॉस जिंकत मुंबईचा कॅप्टन झहीर खाननं पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतलाय. दुसरीकडे सचिनची ही शेवटची रणजी मॅच आहे. शेवटच्या वेळी रणजीचं मैदान गाजवण्यासाठी विक्रमादित्य सचिन तेंडुलकर सज्ज आहे.

२००व्या कसोटी आधी सचिन खेळणार रणजी सामना

Last Updated: Wednesday, October 16, 2013, 13:29

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर २०० व्या कसोटी सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणार आहे. त्यापूर्वी सचिन रणजी क्रिकेट सामना खेळणार आहे.