युतीला राज ठाकरेंची मदत, मनसेची मतं युतीच्या पारड्यात

Last Updated: Monday, May 19, 2014, 12:34

लोकसभा निवडणूक 2014 अनेक कारणांनी ऐतिहासिक ठरतेय. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपनं मारलेली मुसंडी तर आहेच. सोबतच गेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेला भरभरून मतदान करणाऱ्या मतदारांनी यावेळी मनसेला केवळ नाकारलंच नाही तर आपली मतं शिवसेना-भाजपच्या उमेदवारांना दिल्याचं मतदानाच्या आकडेवारीवरून स्पष्टपणे दिसत आहे.