स्यू की यांनी दिलं भारतात येण्याचं आश्वासन

Last Updated: Tuesday, May 29, 2012, 16:12

भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज सकाळी म्यानमारच्या लोकशाही समर्थक नेत्या आँग सान सू की यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधानांनी सोनिया गांधी यांच्या वतीनं सू की यांना भारतभेटीचं आमंत्रण दिलंय.

स्यू की यांच्या पक्षाला चांगले यश

Last Updated: Monday, April 2, 2012, 15:51

आँग सान स्यू की यांच्या नॅशनल लीग फॉर डेमोक्रसीने रविवारी पार पडलेल्या निवडणुकीत घवघवीत यश संपादन केलं आहे. म्यानमारमध्ये लोकशाही प्रस्थापित व्हावी यासाठी गेली काही दशके त्या लढा देत आहेत. स्यू की यांच्या पक्षाने ४४ जागांवर विजय मिळवला आहे. नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी १९९० साला नंतर पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरली.