Last Updated: Thursday, May 16, 2013, 12:19
स्पॉट फिक्सिंग प्रकरणी आमच्या तीन खेळाडूंना तपासासाठी बोलावल्याचं समजलं आहे. हे ऐकून आम्हांला आश्चर्य वाटलं आहे. सध्या आमच्याकडे पुरेशी माहिती नाही. आम्ही यासंदर्भात बीसीसीआयच्या संपर्कात आहोत. निष्पक्ष तपास व्हावा यासाठी आमचं पूर्ण सहकार्य तपास अधिकाऱ्यांना मिळेल. खेळाचं स्पिरीट कायम राहण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि त्यात कोणतीही तडजोड राजस्थान रॉयल्स सहन करणार नाही. शिल्पा शेट्टी राजस्थान रॉयल्स मालक