Last Updated: Wednesday, March 12, 2014, 17:28
लोकसभा निवडणुकीसाठी `आप`ने जोरदार फिल्डींग लावली आहे. लोकसभेच्या सर्व जागा लढविण्याबाबत मोर्चेबांधणी सुरू आहे. मुंबई दौऱ्यावर आपचे नेते अरविंद केजरीवाल आले असून त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलेय. त्याचवेळी `आप`ने आपली पाचवी यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 17 उमेदवारांची नावे जाहीर केलीत.