Last Updated: Wednesday, February 8, 2012, 18:05
श्रीलंकेने भारतासमोर २३४ रन्सचं टार्गेट ठेवलं आहे. लंकेने ८ विकेटच्या बदल्यात २३३ रन्स केल्या. लंकेकडून सर्वाधिक रन्स चंदीमलने केल्या. त्यांने ८१ चेंडूत ६४ धावांचे योगदान दिले. अँजलो मॅथ्यूज आणि मलिंगा नाबाद राहिला. मॅथ्यूजने ३३ तर मलिंगाने १ रन्स केली. तर भारताकडून सर्वाधिक विकेट आर. अश्विनने घेतल्या. त्यांने तिन बळी टिपले.