`आम आदमी` दिल्लीचे सरकार चालवेल - मुख्यमंत्री केजरीवाल

Last Updated: Saturday, December 28, 2013, 13:05

रामलीला मैदानात भ्रष्टाचार संपविण्यासाठी आंदोलन केले. हा प्रवास आता सुरू झाला आहे. दिल्लीतील जनता हताश झाली होती. इथल्या राजकारणामुळे देश खड्ड्यात चालला होता. ही लढाई केजरीवालांना मुख्यमंत्री करण्यासाठी नाही. आम आदमीचे सरकार बनले आहे, पण आम्ही एकटे लढू शकत नाही. सर्वजण मिळून ही लढाई लढू शकतो. असे सांगत आज मी किंवा माझ्या सहा सहकाऱ्यांनीच नव्हे, तर दिल्लीच्या प्रत्येक माणसानं मंत्री आणि मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे, असे प्रतिपादन नवनिर्वाचित मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले.

अरविंद केजरीवाल दिल्लीचे सातवे मुख्यमंत्री

Last Updated: Saturday, December 28, 2013, 12:30

दिल्लीत काँग्रेस आणि भाजपला धक्का देत आम आदमी पार्टीने २८ जागा जिंकत चमत्कार केला. आम आदमीचे नेते अरविंद केजरीवाल यांना दिल्लीच्या राज्यपालांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. केजरीवाल हे सातवे मुख्यमंत्री आहेत.