तुकोबांचे पहिले रिंगण रंगले पिंपरीत!

Last Updated: Tuesday, June 12, 2012, 20:36

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण आज पिंपरीत पार पडलं. गेल्या वर्षीपासून पिंपरीत रिंगण सोहळा सुरू झाला आहे. तिथीनुसार एक दिवस अधिक मिळाल्याने हा रिंगण सोहळा घेण्यात आला आहे. आषाढी वारीतला हा रिंगण सोहळा महत्वाचा मानला जातो.