राज्यभरात कांद्याला किलोला ८० रूपये दर

Last Updated: Friday, September 20, 2013, 14:50

राज्यभरात कांद्याचे दर प्रचंड वाढले आहेत. मुंबईत ७० ते ८० रुपये किलोनं कांदा मिळतोय. तर नाशिकमधल्या बाजारात कांदा ७० ते ८० रुपये आहे. पुण्यातही ७० ते ८० याच भावानं एक किलो कांदा विकला जात आहे. दुसरीकडे केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी मात्र पुढील दोन तीन आठवड्यांत कांद्याचे दर उतरण्याची शक्यता व्यक्त केलीय.

दोन आठवड्यात कांद्याचे दर नियंत्रणात - शरद पवार

Last Updated: Thursday, September 19, 2013, 13:51

कांद्याच्या दरात झालेली दरवाढ पुढील दोन ते तीन आठवड्यात कमी होईल. कांद्याची किंमत आवाक्यात येईल, असे संकेत केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी दिले आहेत. किरकोळ बाजारात एक किलो कांद्याला ७० ते ८० रूपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे पवार यांनी किंमत कमी होण्याची शक्यता वर्तविली तरी कांदाची आवकच कमी असल्याने किंमत खाली कशी येईल, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

डिझेलवरील गाड्या महागणार

Last Updated: Wednesday, June 13, 2012, 20:19

डिझेल कारवरची एक्सईज ड्यूटी वाढण्याची शक्यता आहे. पेट्रोलियम मंत्री जयपाल रेड्डींनी अर्थमंत्री प्रणव मुखर्जींना पत्र लिहून डिझेल कारवर एक्साईज ड्यूटी वाढवण्याची मागणी केली आहे.

पेट्रोल, डिझेल पुन्हा भडकणार?

Last Updated: Monday, February 27, 2012, 18:05

आंतरराष्ट्रीय स्तरावर पेट्रोल, डिझेलचे वाढलेल्या दरांच्या पार्श्वभूमीवर येत्या काही काळात पेट्रोल लिटरमागे चार तर डिझेलमध्ये दोन रुपयांनी पुन्हा दरवाढ होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

दिवाळीच्या तोंडावर महागाईचा 'फटाका बॉम्ब'

Last Updated: Friday, October 21, 2011, 03:53

ऐन दिवाळीच्या तोंडावर देशात महागाईचे फटाके फुटत आहेत. गेल्या सहा महिन्यांतील महागाईने उच्चांक गाठला आहे.