मध्य रेल्वेची सेवा बोंबलली, मालगाडीचा फटका

Last Updated: Saturday, October 5, 2013, 10:56

मध्य रेल्वेच्या मार्गावर ठाण्याजवळ मालगाडी गाडी बंद पडल्याने आज शनिवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सीएसटीकडे येणारी मालगाडी दिवा ते ठाणे दरम्यान बंद पडली.

वांगणीत ओव्हरहेड वायर तुटून तिघे जखमी

Last Updated: Tuesday, June 26, 2012, 12:11

वांगणी रेल्वे स्थानकाजवळ पँटाग्राफ जळून ओव्हरहेड वायर तुटल्याने झालेल्या अपघात तीन प्रवासी जखमी झालेत. जखमींना कल्याण आणि बदलापूर येथील रूग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, अपघातस्थळी रेल्वे अधिकारी पोहोचले असून घटनेची माहिती घेत आहेत.

मध्य रेल्वे सुरळीत, एक्स्प्रेस गाड्या खोळंबल्या

Last Updated: Tuesday, June 26, 2012, 11:07

मध्य रेल्वे वाहतुकीला नेहमीच ग्रहण लागल्याचे आज दिसून आले. वांगणीजवळ ओव्हरहेड वायर तुटल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान ही वाहतूक सुरळीत झाली असली तरी लांब गाड्यांचा खोळंबा झाला आहे.

मुंबईची लाईफलाईन रूळावर

Last Updated: Friday, April 20, 2012, 13:43

मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी रेल्वेवाहतूक तिसऱ्या दिवशी रूळावर आली. मात्र, कुर्ला ते विद्याविहारदरम्यान ती धिम्या गतीने सुरू आहे. मंगळवारी रात्री कुर्ला येथील सिग्नल कंट्रोल रूमला आग लागल्याने सिग्नल यंत्रणेचे तीनतेरा वाजले आणि मध्य आणि हार्बरची रेल्वेसेवा खोळंबली. त्यामुळे मुंबईकर प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. आज तिसऱ्या दिवशी काहीप्रमाणात प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. ९५ टक्के रेल्वे वाहतूक पूर्वपदावर आली आहे.