मराठी हद्दपार : UPSCप्रकरणी राज ठाकरे गप्प का?

Last Updated: Wednesday, March 6, 2013, 16:47

केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे UPSC नं प्रादेशीक भाषांमध्ये परीक्षा देण्याचा पर्याय काढून टाकलाय. आयोगाच्या या निर्णया विरोधात शिवसेनेनं हुतात्माचौकात आंदोलन केलंय. मात्र, मराठीच्या मुद्यासाठी रान उठवणा-या राज ठाकरेंच्या मनसेकडून या विषयावर अद्याप पर्यंत कोणतीही प्रतिक्रीया आलेली नाही.

UPSCअभ्यासक्रम : मराठीसह प्रादेशिक भाषांची हाकलपट्टी

Last Updated: Wednesday, March 6, 2013, 12:42

केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच UPSC नं आपल्या अभ्यासक्रमातून मराठीसह सर्व प्रादेशिक भाषांची हाकलपट्टी केलीय. आयोगाच्या परीक्षेच्या अभ्यासक्रमात यंदाच्या वर्षी बदल करण्यात आलाय.

झी २४ तासच्या बातम्या आता तुमच्या बोलीभाषेत

Last Updated: Tuesday, September 11, 2012, 23:53

महाराष्ट्रातील आघाडीची वृत्तवाहिनी असलेल्या ‘झी 24 तास’वर जागर बोलीभाषेचा हा अनोखा उपक्रम सुरु करण्यात आला असून दर बुधवारी एका बोलीभाषेतून त्या भागातील बातम्या प्रक्षेपित करण्यात येणार आहेत. या बुधवारी मालवणी भाषेतून या उपक्रमाची सुरुवात होणार असून गणपती उत्सवाच्या तयारीत दंग असलेल्या मालवणी मुलखातील खबरबात खास मालवणी बोलीतील बातम्यांमधून सादर केली जाणार आहे.