सावर्डे गावाला वादळाचा तडाखा, अनेकांचे संसार उघड्यावर

Last Updated: Tuesday, November 5, 2013, 19:01

मुंबई-गोवा महामार्गावरच्या सावर्डे गावाला ऐन दिवाळीत वादळाचा मोठा फटका बसला. सोमवारी संध्याकाळी आलेल्या वादळाने अनेक घरांवरची छपरे उडाली आणि संसार उघड्यावर प़डले. अवघी पाच मिनिटे घोंघावलेल्या या वादळात शेकडो झाडे मुळापासून उन्मळून घरांवर तसेच रस्त्यांवर पडली. त्यामुळे सावर्डे परिसरात प्रचंड नुकसान झाले आहे. ऐन दिवाळीत आलेल्या या वादळामुळे प्रकाशाचा हा सण या गावक-यांसाठी अंधार घेऊन आलाय.