Last Updated: Friday, November 11, 2011, 15:14
शेतकरी संघटनांनी ऊस दरवाढीसाठी पुकारलेल्या आंदोलनावर तोडगा निघाला असला तरी शरद जोशींच्या शेतकरी संघटनेने तो आपल्याला मान्य नसल्याचं म्हटलं आहे. सरकारने देऊ केलेला वाढीव दर एक रकमी देणार किंवा हप्त्या हप्त्याने देणार याबाबत संदिग्धता असल्याचं मत शरद जोशींच्या शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधीने व्यक्त केली आहे.