`विंदू`च्या दाव्यांचा ललित मोदीकडून इन्कार

Last Updated: Tuesday, February 25, 2014, 12:47

आयपीएल मॅच फिक्सिंग प्रकरणात झालेल्या खळबळजनक खुलाशावर आयपीएलचा माजी संचालक ललित मोदी याने तातडीनं खुलासा दिलाय.

केजरीवालांचे सरकारी स्टींग ऑपरेशन, हेल्पलाईन नंबर जारी

Last Updated: Wednesday, January 8, 2014, 20:32

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सरकारी भ्रष्टाचार संपविण्यासाठी विडा उचलला आहे. यासाठी आधी जाहीर केल्याप्रमाणे त्यांनी हेल्पलाईन नंबर प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिक सकाळी ते रात्री यावर संपर्क साधून आपली तक्रार करू शकणार आहे. त्यामुळे केजरीवाल यांचे हे सरकारी स्टींग ऑपरेशन असेल, असे म्हटले जात आहे.

स्टींग ऑपरेशन : पोलीस प्रशिक्षण केंद्रातही लागते चिरी-मिरी!

Last Updated: Wednesday, December 25, 2013, 22:31

सर्वात जास्त भ्रष्टाचारी खातं कोणतं? हा प्रश्न मनात आला तर उत्तर मिळतं पोलीस खातं... आणि ही बाब स्पष्ट होते ती, लाचलूचपत प्रतिबंध विभागाच्या आजवरच्या आकडेवारीवरुन.

दिल्ली मेट्रोच्या खोल्या आणि टॉयलेट प्रेमींसाठी भाड्यानं

Last Updated: Wednesday, September 18, 2013, 12:30

दिल्लीतल्या मेट्रोच्या सीसीटीव्ही फुटेजचा एमएमएस बनवून विकण्याचा प्रकार नुकताच घडला असतांना, दिल्ली मेट्रो पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकलीय. झी मीडियानं केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. मेट्रो रेल्वेच्या खोल्या आणि टॉयलेट प्रेमी युगुलांना सर्रास भाड्यानं दिले जातायेत. त्याद्वारं मेट्रोतील कर्मचारी पैसा कमवतायेत.

मोदी सरकारनं फेटाळला वंजारा यांचा राजीनामा

Last Updated: Wednesday, September 4, 2013, 14:56

बनावट चकमक प्रकरणातील आरोपी आणि सध्या तुरुंगात असलेले आयपीएस अधिकारी डी. जी. वंजारा यांचा राजीनामा फेटाळण्यात आलाय.

`मोदी सरकारच्या सांगण्यावरूनच केली बनावट चकमक`

Last Updated: Wednesday, September 4, 2013, 14:47

बनावट चकमक प्रकरणात निलंबित झालेले आणि सध्या तुरुंगात कैद असलेले वादग्रस्त आयपीएस अधिकारी डी. जी. वंजारा यांनी पोलीस सेवेचा राजीनामा दिलाय.

`झी २४ तास`च्या `स्टिंग ऑपरेशन`मध्ये बिल्डरांचा पर्दाफाश

Last Updated: Sunday, October 21, 2012, 09:19

मुंबईचे बिल्डर हवेत घरं बांधण्यात उस्ताद आहेत. झी बिझनेसच्या एका इन्वेस्टिगेशनमध्ये याबाबतची खरीखुरी माहिती समोर आली. प्रोजेक्टला साधी प्राथमिक मंजूरी मिळण्याआधीच ग्राहकांना घराचं स्वप्न दाखवण्यात येतंय. एवढंच नाहीतर बिल्डर ग्राहकांकडे 40 टक्के पर्यंत ब्लॅकमनीची मागणी करतायेत.

अम्पायर्सची लाचखोरी... स्टींग ऑपरेशनमध्ये झाली उघड

Last Updated: Tuesday, October 9, 2012, 11:25

नुकत्याच पार पडलेल्या टी २० वर्ल्डकप आणि ऑगस्टमध्ये पार पडलेल्या श्रीलंका प्रिमीअर लीग दरम्यान जवळजवळ सहा अम्पायर्सनं ‘चहा-पाणी’ देणाऱ्या टीमच्या बाजूनं निर्णय देण्याची तयारी दाखवली होती. ही गोष्ट एका स्टींग ऑपरेशनमध्ये उघड झालीय.

लाचखोर मुख्याध्यापकाचे स्टिंग ऑपरेशन

Last Updated: Monday, July 2, 2012, 13:27

मृत शिक्षकाच्या पेन्शनच्या कागदपत्रांवर सही करण्यासाठी लाचेची मागणी या मुख्याध्यापकानं केली आहे. इतकंच नाहीतर या मृत शिक्षकाच्या मुलाकडं त्यानं पार्टीचीही फर्माइश केली. याचा भांडाफोड झी 24 तासवर करण्यात आलं आहे.