Last Updated: Wednesday, October 17, 2012, 13:40
जन. अरुणकुमार वैद्य यांची हत्या करणार्या मारेकऱ्यांचा सतत निषेध आणि निषेधच झाला पाहिजे. मात्र, काही मंडळी संकुचित अस्मितांना फुंकर घालत या मारेकऱ्यांचे उदात्तीकरण करण्याच्या प्रयत्नात आहेत. या प्रयत्नांना शत्रूची फूस आहे. हे उदात्तीकरण धोकादायक आहे. मानवतेला आणि देशभक्तीला कलंक लावणारं आहे. दहशतवादाच्या अशा उदात्तीकरणाचा सतत निषेधच केला पाहिजे.