कोल्हापुरात शिवसेनेचं ‘टोल’फोड, आज बंदची हाक

Last Updated: Monday, January 13, 2014, 08:05

टोलवसुलीच्या विरोधात आज शिवसेनेनं कोल्हापूर बंदची हाक दिलीय. कोल्हापूरकरांच्या संतापाचा पुन्हा उद्रेक झाला. टोलविरोधी आंदोलनला रविवारी हिंसक वळण लागलं. कोल्हापुरातील फुलेवाडी आणि शिरोली टोलनाक्यांची शिवसैनिकांनी आणि संतप्त नागरिकांनी तोडफोड केली.

टोलविरोधी आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ आणि तोडफोड

Last Updated: Sunday, January 12, 2014, 15:23

कोल्हापूर टोल प्रश्न आता चांगलाच चिघळलाय. टोलविरोधी आंदोलनाला आता हिंसक वळण लागलंय. कोल्हापुरातील फुलेवाडी आणि शिरोली टोलनाक्यांची आज शिवसैनिकांनी आणि संतप्त नागरिकांनी तोडफोड केलीय. टोल नाके पेटवण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केलाय.