मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची गुगली, BCCI निवडणुकीबाबत मौन

Last Updated: Tuesday, September 17, 2013, 10:14

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या रिंगणात उतरले आहेत. माझगाव क्रिकेट क्लबचे सदस्य होत मुख्यमंत्र्यांनी एमसीएमध्ये एंट्री घेतली आहे. मात्र, मी BCCIची निवडणूक लढणार की नाही, याबाबत बोलण्यास मुख्यमंत्र्यांनी नकार दिलाय.