वीज दरवाढीचे संकट, मिनी मॅचेस्टरमधील कोट्यवधीची उलाढाल ठप्प

Last Updated: Friday, November 8, 2013, 23:19

राज्यातल्या यंत्रमागधारकांसमोर वीज दरवाढीचे मोठे संकट उभं राहिलय. वीज वितरण कंपनीकडं अनेकदा मागणी करुनही दरवाढ रद्द करण्यात न आल्याने इचलकरंजी शहरातील संतापलेल्या यंत्रमागधारकांनी गुरुवारपासून पाच दिवसांचा बंद पुकारलाय. त्यामुळं इचलकरंजीतील (मिनी मॅचेस्टर) कोट्यवधीची उलाढाल ठप्प झालीय.